डेरा आंदोलन भर पावसातही सुरुच , प्रशासन मात्र गप्प !
अद्याप शासनाने नाही घेतली दखल -आंदाेलनाचा १४३वा दिवस !
तब्बल ५००कामगार आंदाेलनात सहभागी.
विशेष प्रतिनिधी/ किरण घाटे
चंद्रपूर- किमान वेतन लागू करा व सात महिण्यांचे प्रलंबित वेतन तातडीने द्या ! या व अन्य प्रमुख मागण्यांसाठी येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ मेडीकल काँलेज तथा शासकीय रुग्णालयातील पाचशे कंत्राटी कामगारांचे डेरा आंदाेलन सुरु असुन या आंदाेलनचा आजचा १४३वा दिवस असल्याचे मनपाचे विद्यमान नगर सेवक पप्पू देशमुख यांनी आज सांगितले .दरम्यान या आंदाेलनाला ४महिण्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असून डेरा आंदाेलनातील कंत्राटी कामगारांनी मंगळवार दि. ८जून पासून साखळी उपाेषणांस सुरुवात केलेली आहे . जगभरात थैमान घातलेल्या महाभयानक काेराेना संकटात या काेराेना याेध्दांनी आपला जीव धाेक्यात टाकुन निष्ठेने व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावीत सेवा दिली आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या या अमुल्य व उल्लेखनिय कार्यांचा गाैरव देखिल प्रशासनाने केला आहे .पण आजच्या परिस्थितीत त्यांना कुठल्याही प्रकारचे सात महिण्यांचे प्रलंबित वेतन मिळाले नसल्याचे शासकीय रुग्णालयातील कंत्राटी सुरक्षा रक्षक कविता सागाेळे यांनी इम्पँक्ट २४ न्यूज चैनलच्या प्रतिनिधीशी बाेलतांना आज चंद्रपूर मुक्कामी सांगितले . कामगारां साेबतच त्यांचे कुटुंबावर अक्षरशा उपासमारीची पाळी आली आहे .काहीं कामगारांनी परिवाराचा उदार निर्वाह चालविण्यांसाठी खासगीरुपात कर्ज उचलल्याची चर्चा ऐकावयास मिळाली आहे .एंकदरीत आता आंदाेलनातील सर्वचं कामगारांच्या कुटुंबाची परिस्थिती खालावली असुन ते स्वता हतबल झाले असल्याचे दिसून येते .केलेल्या कामांचा माेबदला त्यांना मिळायलाच हवा अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांनरुन आता उमटु लागली आहे तरं आंदोलन कर्त्यांच्या मनात प्रशासनाबाबत सतत असंतोष खदखदत आहे . या आंदाेलनात शेकडाें कंत्राटी कामगार उतरले असुन सदरहु आंदाेलना बाबत अद्याप ताेडगा निघाला नाही .दरम्यान चंद्रपूर मनपाचे विद्यमान नगर सेवक तथा जनविकास सेनेचे सर्वेसर्वा पप्पू देशमुख यांनी वेळाेवेळी या आंदोलन कर्त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे . परंतु अद्याप शासन व प्रशासनाने या आंदाेलनाची दखल घेतली नाही. .चंद्रपूरात भर पावसातही हे आंदोलन सुरु असतांना शहरातील कुठल्याही लाेकप्रतिनिधी या सुरु असलेल्या आंदाेलना कडे लक्ष केन्द्रीत केले नाही .हे येथे विशेष उल्लेखनिय आहे . दरम्यान मागण्यांची पुर्तता तातडीने न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यांचा इशारा डेरा आंदाेलनातील कामगारांनी शासनाला दिला आहे .चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालले हे आंदोलन असून अद्यापही हे आंदोलन सुरुच आहे चंद्रपूर शहरात आज दुपारी वीजेच्या कडकडाटसह दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतरही हे आंदोलनकर्ते डेरा आंदोलन मंडपीच हजर हाेते .