उदगीर तालुक्यातील पशू वैधकीय दवाखाण्यात 16 पदे रिक्त!
प्रतिनिधी /जीवन भोसले
उदगीर (लातूर) तालुक्यातील शेतकरी वर्गाची संख्या अधिक आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे,
शेती व्यावसायाकरीता बैल जोडीचा मोठ्या प्रमानात वापर केला जातो, तसेच दुग्ध व्यवसाय, शेळ्या, गाई , व ईतर पाळीव पशू शेतकरी पाळत असतो, या पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यातील व ग्रामीण भागात पशुवैद्यकीय चिकित्सालयाची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र उदगीर पंचायत समितीतील अनेक पशू चिकित्सालयातील पदे रिक्त आहेत,
उदगीर तालुक्यात पशुधन पर्यवेक्षकाचे मंजूर पदे 23 व भरलेली पदे 19, आहेत , 1)पं. स. उदगीर, 2)प. वै.द.तोंडार, 3)प.वै.द.रावनगाव,4)प.वै.द.हेर, असे चार पद रिक्त आहेत , तसेच वर्णोपचारक, वाढवणा (बू) व देवर्जन या ठिकाणी दोन पदे रिक्त आहेत..
तसेच वाढवणा श्रेणी 1, देवर्जन या ठिकाणी दोन पदे, दावनगाव, शिरोळ, कौळखेड, नागलगाव, नळगीर, किणी या ठिकाणी
परिचर पदाच्या एकून नऊ जागा रिक्त आहे.
त्यामुळे पशुधनावर त्याचा विपरीत परिणाम दिसुन येत आहे, पशुधनाच्या आरोग्य तपासणी पासुन तर साफसफाई पर्यंतची सर्वच कामे डॉक्टरांना करावे लागेत आहे याची प्रशासनाने दखल घेतली पाहीजे,तसेच रिक्त जागा लवकर भरण्यात यावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे,