मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं माझं कर्तव्य – आ. रत्नाकर गुट्टे

0
733

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं माझं कर्तव्य – आ. रत्नाकर गुट्टे

आरूणा शर्मा परभणी जिल्हा प्रतिनिधी

पालम तालुक्यातील मौजे चाटोरी येथे विद्युत महावितरण उच्चदाब श्रेणी ३३ के.व्ही. उपकेंद्र उभारणीचे भूमिपूजन आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांच्या शुभहस्ते सोमवारी संपन्न झाले. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विद्युत महावितरण विषयक समस्या सोडविण्याचा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सपाटाच सुरू केला असून सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत. पालम तालुक्यातील मौजे चाटोरी व परिसरातील अनेक गावांना लाइटची गंभीर समस्या भेडसावत असल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले होते. याबाबतीत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणून चाटोरी येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यास मंजूरी मिळाली असून काही दिवसात कामास सुरुवात होणार आहे. सर्वसामान्य जनतेने मला अत्यंत मोलाचे सहकार्य केले असल्याने त्यांच्या समस्या सोडविण्यास मी कुठेही कमी पडणार नसल्याचे मत या वेळी आमदार गुट्टे यांनी व्यक्त केले.
मौजे चाटोरी येथे विद्युत महावितरण उच्चदाब श्रेणी ३३ के. व्ही. उपकेंद्र उभारल्याने चाटोरीसह परिसरातील अनेक गावांचा लाईटचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याने सर्वसामान्य नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमास रा.स.प.जिल्हाध्यक्ष अँड संदीप आळणुरे,पालम पंचायत समिती ऊपसभापती अण्णासाहेब किरडे, नारायण दुधाटे,
असदखाँ पठाण, भगवान सिरसकर, गोपीनाथ तुडमे,
संतोष पैके, विनोद किरडे,भागवत किरडे यांच्यासह विद्युत महावितरण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here