गडचिरोली येथे ग्राम संवाद सरपंच संघाची बैठक झाली संपन्न
✍️सुखसागर झाडे गडचिरोली:-
ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सरपंच बैठक सर्किट हाउस गडचिरोली येते पार पडली.सदर बैठकीला ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, विदर्भ अध्यक्ष दिगाम्बर धानोरकर, विदर्भ सरचिटणीस नीलेश पुलगमकर ,प्रदेश कार्यकारणी सल्लागार कविता भगत,सदस्या नंदताई कुलसंगे, जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, तसेच जिल्ह्यातील जवळपास 100 चे वर विविध ग्रामपंचायत येथील सरपंच उपस्थित होते.
सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत चे स्ट्रीट लाइट बिल व पाणी पुरवठा बिल,15 व्या वित आयोगातून न भरता,वेगळा निधी देण्यात यावा,सरपंच यांना कोरोना योद्धा घोषीत करून 50 लाखाचा विमा कवच देण्यात यावा. सरपंच यांचेवर कोणी हल्ला केला किंवा गावात ग्रामपंचायत चे काम करताना अडथळा आणल्यास शासकीय काम अडथळा या नियमखाली संबधीत व्यक्ती वर गुन्हे दाखल करावे असे ठराव पास करून शासनास पाठविण्याचे ठरविण्यात आले.
तसेच जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात यावे.
सर्व सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांनी ग्राम संवाद सरपंच संघ संघटना नसून एक कुटुंब समजून कार्य करावे असे ठरविण्यात आले. बैठकीत मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अंतर्गत केला जाणारा विविध विकास, संघटना बळकटीकरण व सरपंच उपसरपंच व सद्स यांचे अधिकार व जबाबदारी तथा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.