लोकल रेल्वे मध्ये कडक निर्बंध लादनार राज्य सरकार!
बनावट प्रवास करणारे पकडले जाणार !
Impact 24 news
मुंबई महानगर आणि पुणे महानगर प्रदेशातील कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून या दोन्ही महत्त्वपूर्ण ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यावर निर्बंध अधिक व्यापक तपासले जाणार आहेत सध्या तरी अत्यावश्यक सेवेची बनावट ओळखपत्रे सादर करून बरेच जन प्रवास करत आहेत. त्यांची प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सरकारची ही एक डोकेदुखीच आहे.रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे बनावट ओळखपत्राच्या आधारे रेल्वेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी एकात्मिक प्रवास पास
(युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास)
देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हे अधिकार पत्र असेल तरच रेल्वेच्या खिडकीवर पास
किंवा तिकीट या पुढील काळात प्रवास करताना मिळू शकेल.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या एप्रिलपासून राज्य सरकारने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे प्रवासाला परवानगी दिली आहे.
गर्दी कमी व्हावी या उद्देशाने अत्यावश्यक सेवेतील सर्वांना या सेवेचा लाभ देण्यात आलेला नाही.
तरीही बनावट ओळखपत्रांच्या आधारे पास किंवा तिकिटे मिळवली जात आहेत.
यातूनच उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवाशांची गर्दी वाढली.
सकाळी किंवा सायंकाळी नेहमीप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली.
सध्या मध्य रेल्वेतून दररोज १८ लाख तर पश्चिम रेल्वेतून ११ ते १२ लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत.
यातील ५० टक्के प्रवासी बनावट ओखळपत्राच्या आधारे किंवा रेल्वेची दिशाभूल करून प्रवास करीत असल्याचा संशय राज्य सरकारला आहे.
त्यामुळे महानगर प्रदेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोठा उद्रेक होण्याच्या भीतीने रेल्वेतून होणाऱ्या प्रवासावर अधिक निर्बंध आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.