आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथे चक्का जाम व जेलभरो आंदोलन

0
740

आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथे चक्का जाम व जेलभरो आंदोलन

आमदार डॉ.देवराव होळी सह इतर पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना पोलीस विभागाने घेतले ताब्यात

✍️सुखसागर झाडे चामोर्शी:-

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समाप्त झाले आहे.त्यामुळे ओबीसी समाजाच्या घटनादत्त अधिकारावर गदा आलेली आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षनाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्रतिनिधींवर अन्याय झालेला आहे. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसीना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे,त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियेतेमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व महविकास आघाडी सरकारचे कर्मकांड जनते समोर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रमेश बारसागडे ज्येष्ठ मार्गदर्शक कोमेरवार सर , प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील

वरघंटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंचायत समितीचे उपसभापती सौ.वंदना गौरकर,भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष भास्कर बुरे , भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष पिपरे , युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी व शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी चे वतीने स्थानिक बस स्टँड चामोर्शी येथे तेली समाज चाळ समोर मुख्य मार्गावर रणरणत्या उन्हात भव्य चक्का जाम व जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशन चामोर्शीचे पोलीस निरीक्षक विपीन शेवाळे यांनी आंदोलन कर्ते यांना वाहनात बसवून पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. यात प्रामुख्याने आमदार डॉ देवराव होळी , कृषी सभापती रमेश बारसागडे , भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, स्वप्नील वरघंटे , भास्कर बुरे , आशीष पिपरे , प्रतीक राठी यांना घेऊन जाण्यात आले.

यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांना पोलीस स्टेशन येथे समज देऊन घरी परत पाठवण्यात आले.

आंदोलन कर्त्यानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला आग लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बळजबरीने रस्त्यावर आग लावण्यास मज्जाव केला व आग लावू दिली नाही.त्यावेळी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा रोष अनावर झाला होता. परंतु आमदार डॉ देवराव होळी यांच्या निर्देशानुसार प्रकरण शांत झाले या गोष्टीचा आमदार डॉ होळी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी बस स्टँड येथे काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आज भारतीय जनता पक्ष तालुका चामोर्शी चे वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तालुका चामोर्शीचे विविध आघाडीचे पदाधिकारी व विशेषतः युवा मोर्चा कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here