राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…
वणी : राजर्षी शाहू महाराज यांचे आज जून २६, इ.स. १८७४ वी जयंती. छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते.ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. जातिभेदावर लढा देत असतांना अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. इतर अनेक कार्य त्यांनी केले असून, “शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते.” असे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. अशा थोर समासुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना 147 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आज महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीचे वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त वणी येथील रंगनाथ नगर मधील तैलचित्राला हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन केले.
यावेळी समितीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले, हिंदुनिस्पृह स्वाभिमानी संघटक कासार सागर मुने, समनव्यक लोकसेवक अमित उपाध्ये, विदर्भवादी युवा नेते राहुल खारकर, इंजि चैतन्य तुरविले, वैभव डंबारे, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे अध्यक्ष दिगांबर चांदेकर, तसेच परिसरातील नागरिक शोभा काकडे, सुमित्रा पाटील, अजय ठोंबरे, अर्चना विशाल ठोंबरे उपस्थित होते.