मराठा आरक्षणाचा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून करणाऱ्या आघाडी सरकारचा आज औसा येथे चक्काजाम आंदोलन करुन निषेध
लातूर उपजिल्हा प्रतिनिधी/ लातूर
ओमकार सरदेशमुख – ९८२३३३१८५४ : (औसा) १.५ वर्षापूर्वी राज्यात सत्तेसाठी १ अनैसर्गिक प्रयोग झाला जो आज राज्याच्या मुळावर उठला आहे. केवळ आणि सत्ता लोभापायी एकत्र आलेल्या आघाडी सरकारने सामाजिक विषयांचं पोतेरे केलं आहे. मा उच्च न्यायालयात टिकवलेलं मराठा आरक्षण आघाडी सरकारमुळं सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं. ओबीसी आरक्षणाचा विषय तर अजून सोपा होता पण आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणही रद्द झाले आहे. या सरकारकडून झालेल्या चूका नाहीत तर आघाडी सरकारने मराठा आरक्षण व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा नियोजितपणे, थंड डोक्याने खून केला आहे. आज औसा आणि कासार सिरसी येथे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मी औसा येथील चक्का जाम आंदोलनात सहभागी होऊन सामाजिक विषयांचे गांभीर्य नसलेल्या आघाडी सरकारचा तीव्र निषेध केला.
ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्याचे अधिकार ज्यांच्या हातात आहेत तेच मंत्री आंदोलनाचे ढोंग करत आहेत. आधी आरक्षण घालवलं आणि आता आंदोलनाचं ढोंग करून ओबीसी समाजाची क्रुर चेष्टा करू पाहत आहेत.