राष्ट्रीय आंतरराज्य दौड स्पर्धा
क्रांतीनगरीच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा
प्रतिनिधी/आशिष गजभिये
चंद्रपूर/चिमूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंद असलेल्या चिमुरच्या विक्रमने नव्याने एका विक्रमाला गवसणी घालत क्रांतीनगरीच्या मानत शिरपेचात नवा तुरा रोवला आहे. या पूर्वी अनेक दौड स्पर्धा आपल्या नावानी करणाऱ्या या धावपट्टू ने नुकतीच पटियाला येथे पार पडलेली राष्टीय आंतरराज्य दौड स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.जिद्द,आत्मविश्वास आणि ध्येय गाठण्यासाठी समर्पणाची भावना हे शब्द विक्रम बंगेरीया या युवकाला तंतोतंत लागू पडतात. कारण क्रांतीनगरीच्या या सुपुत्राने पंजाबमधील पटियाला येथे पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रिय आंतरराज्य दौड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात एक प्रबळ दावेदारी दाखल केली आहे.
सुमारे १२ वर्षांपूर्वी मोठया भावाच्या प्रोत्साहनामुळे विक्रम अथलेटिक्स मध्ये आला.राज्य शालेय स्पर्धेत १५०० मिटर स्पर्धेत अपयशी झाल्यावर त्याने जोमाने सरावाला सुरवात केली.काही दिवस नागपुरात रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला.भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या विक्रम ने या स्पर्धत मध्यप्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. नुकताच परपडलेल्या या स्पर्धेत विक्रम ने सुवर्ण पदकाला गवसणी घालत १० हजार मीटर अंतर ३० मिनिट १६.४४ सेंकंदात पूर्ण केलं आहे. त्याच्या या यशाने मातृभूमीसह विदर्भातुन त्याच्या वर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
या पूर्वी विदर्भातील दोघेच
विक्रम ने स्पर्धेत मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व केले पण मूळचा तो महाराष्ट्रातील विदर्भाचा असून त्याने या सारखे अनेक स्पर्धा आपल्या नावावर केल्या आहे. आंतरराज्य किंवा खुल्या राष्ट्रिय दौड स्पर्धेत पुरुषांत आतापर्यत दोनच धावपट्टू ना सहभागी होण्याची संधी मिळाली.स्व.भरतसिंग ठाकुर यांनी १९८९ च्या गुंटूर स्पर्धेत महाराष्ट्राचे तर चंद्रपूरच्या वामन बोधे यांनी कोलकाता येथील स्पर्धेत कोल इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होते.त्या मुळे राष्टीय पातळीवर वरिष्ठ गटात १० हजार मिटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा विदर्भातील पहिलाच धावपट्टू ठरला आहे.
चिमूर परिसरातील युवक – युवतींना सांगायचे आहे की,स्वतःची क्षमता ओळखा यश – अपयशामध्ये फक्त मानसिकतेचा फरक आहे.जग करू शकले तर मी नाही? हा प्रश्न स्वतःला विचारा.तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकणार नाही. विक्रम बंगेरीया