नियोजन शून्य काम, दूषित पाणीपुरवठा
नांदा फाटा/कोरपना (चंद्रपूर), प्रतिनिधी : कोरापना तालुक्यातील लोकसंख्येचा बाबतीत सर्वात मोठी नांदा ग्रामपंचायत म्हणून ओडखली जाते. नागरिकाचा पिण्याचा पाण्याचा दृष्टीने शासनाने जलस्वराज्य प्रकल्प २ पाणी पुरवठा योजना मंजूर केली मात्र जलस्वराज्यचा भोंगळ कारभाराने जनता त्रस्त झाली आहे.
नियोजनशून्य काम :
जलस्वराज्य प्रकल्प २ अंतर्गत पाणी पुरवठा योजना नांदा पाईप लाईन चे काम करण्यात आले. ते काम नियोजन बद्ध केले नसून वाटेल तिथे पाईप लाईन टाकून ठेवली आहे. महत्वाचे म्हणजे पाईप लाईन टाकली मात्र त्याचीच पाईप लाईन त्यांना भेटत नसल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे अनागोंदी कारभार केला असल्याने ग्रामपंचायत ला हस्तांतर केल्यावर त्यांना ही पाईप लाईन मिळेल काय हा सामजस्य नागरिकांना आताच पडला आहे.
गावातील रस्त्यात गड्डे :
पाणी पुरवठा योजनेचा पाईप लाईन चे काम व नळ कनेक्शन करताना गावातील पक्के रस्ते फोडण्यात आले. परंतू रस्त्याची डागडूजी व्यवस्थित न केल्याने रस्ते दबल्या जात असून त्या ठिकाणी ब्रेकर सारखे गड्डे पडल्या जात आहे. तसेच पाईप लाईन लीक झाल्याचं जगो- जागी खड्डे खोदकाम केल्या जात आहे मात्र भरणा न केल्याने त्या ठिकाणी पाणी साचल्या जात आहे. याचा नाहक त्रास ये जा करणाऱ्या नागरीकांना होत आहे.
दूषित पाणीपुरवठा :
काही ठिकाणी पाईप लाईन लीक असताना सुद्धा पाणी पुरवठा सुरू केला अनेकदा लाखो लिटर पाणी वाया गेले. असले तरी देखील पाणी पुरवठा सुरू करण्यात आला परंतू पाणी पिण्या योग्य नसून दूषित पाणी पुरवठा केल्या जात असून पाण्याचा वास येत असल्याचे नागरिकांची बोंब आहे.
समिती कागदोपत्री :
जलस्वराज्य प्रकल्प २ पाणी पुरवठा योजना सुरू करण्या अगोदर गावातील प्रतिष्ठित व सुशिक्षित नागरिकांची समिती नेमण्यात आली. परंतू त्या समितीला न विचारता व कोणत्याही सभा न घेता समितीतील सभासदांना या बद्दल काहीही माहिती नसताना काम मात्र जोमात करण्यात आले.काम पूर्णत्वास आले तरी सभासदांना यांची भनक सुध्दा नाही.
“जलस्वरज्य प्रकल्प २पाणी पुरवठा योजना नांदा अनागोंदी कारभार सुरू आहे. समिती गठीत करण्यात आली परंतू कोणत्याही प्रकारची सभा, बैठक किंवा साधी विचाराना सुध्दा केली नाही. समितीचा फक्त नामधारी बोर्ड तयार करून लावण्यात आला. यांचा कामाने जनता मात्र त्रस्त झाली आहे.”
– नंदू भोयर, सचिव जलस्वरज्य समिती