तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह

0
718

तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा

 

गाव निहाय आराखडा तयार…

 

Impact 24 news
तालुका प्रतिनिधी
पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ/झरी जामणी
मो 9763808166

खरीप २०२१ या वर्षात झरी तालुक्यातील प्रत्येक गावात “कृषी संजीवनी सप्ताह” दिनांक २१ जुन २०२१ ते १ जुलै २०२१ पर्यंत साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे.

कृषीविषय संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ,आत्मा,कृषि मित्र मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत जनजागृती करणे व प्रसिध्दी देणे,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना,जमीन आरोग्य पत्रिका वितरण व वाचन,परंपरागत कृषि विकास योजना,केंद्ग व राज्य शासनाच्या कृषि व कृषि संलग्न विभागाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन,मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहूपीक पध्दतीची प्रसार, एकात्मीक शेती पध्दती संकल्पनेबाबत,हायड्रोफोनिक्स -हिरवा चारा निर्मीती, बी-बियाणे, खते,औषधे खरेदी व वापर करताना घ्यावयाची काळजी, मुलस्थानी जलसंधारण जनजागृती,आपत्कालीन पीक नियोजन आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच बिजप्रक्रिया,बीबीएफ पेरणी पद्धतीने,गुलाबी बोन्डअळी ला आळा घालण्यासाठी एक गाव एक वाण या पद्धतीने लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करणे. तालुका कृषी कार्यालयातील कृषि सहाय्यक,कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी हे गावनिहाय बैठकींना उपस्थित राहणार असून सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी आनंद बदखल यांनी केले आहे.या कृषी संजीवनी सप्ताहमध्ये आडकोली, दाभाडी, खडकडोह, वाल्हासा, जुनोनी,चिंचघाट,मार्की,पार्डी तसेच अनेक गावात व शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहेत.

यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल, मंडळ कृषी अधिकारी संजय अटक,मंडळ अधिकारी हटवार,कृषी सहाय्यक प्राची उईके,सहाय्यक राजू कुळमेथे, सहाय्यक नम्रता कुमरे,सहाय्यक मनोज कोरंगे,पोकरा प्रशिक्षक राहुल जाधव,समूह सहाय्यक अक्षय मेश्राम,कृषिमित्र निलेश भोयर,तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज जाधव, सहाय्यक बेरळीकर,सहाय्यक अपलवार,कृषी विगभागाचे कर्मचारी,शेतकरी बंधू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here