स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जेसीआय राजुरा रॉयल कडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार
राजुरा प्रतिनिधी:-
स्वातंत्र्यदिनाच्या शुभ प्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन ट्रस्ट एकेडमी राजुरा याठिकाणी करण्यात आले.
राजुरा येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी जेसीआय राजुरा रॉयलच्या अध्यक्ष जेसी सुषमा शुक्ला , राजुरा येथील युवक पत्रकार जाकिर अली सय्यद व असिफ सैय्यद मित्र मंडळ राजुराचे अध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते आसिफ सय्यद या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 15 ऑगस्ट 2020 ला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .
कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेता सोशल डिस्टंसिंग चे नियम पाडत, कमीतकमी वेळेमध्ये, विध्यार्थी यांनी केलेल्या अप्रतिम कामगिरी बद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी जेसीआय राजुरा रॉयल्सचा अध्यक्ष जेसी सुषमा शुक्ला, सामाजिक कार्यकर्ते व भाजप नेता वामन तुरणकार , राजुरा येथील प्रसिद्ध आरोग्य चिकित्सक डॉ.राजेश कतवारे, नवराष्ट्र चे युवा पत्रकार सय्यद जाकीर सय्यद नसीम तसेच आसिफ सय्यद मित्र मंडळ राजुराचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आसिफ सय्यद, जेसीआय राजुरा रॉयल च्या फाउंडर प्रेसिडेंट जयश्री शेंडे , सदस्य रेखा बोढे तसेच समाजकार्यात हिरीरीने भाग घेणारे व जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव चे शिक्षक स्वतंत्रकुमार कृष्णदत्त शुक्ला उपस्थित होते.
नुकतेच विविध बोर्डाचे 10 वी व 12 वी चे निकाल जाहीर झाले, यात राजुरा शहर व ग्रामीण भागातील अनेक शाळांचे उत्कृष्ट निकाल लागले, या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे विचार या तीन संघटनांनी केला.
या प्रसंगी गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते
वामन तुरणकार यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले, जेसीआय अध्यक्षा सुषमा शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्रता दिनाचे शुभेच्छा देत ध्येयनिश्चिती व वेळेचे नियोजन करून यश मिळविण्याचे मार्गदर्शन केले तर राजुरा येथील प्रसिद्ध आरोग्य चिकित्सक डॉ राजेश कातवारे यांनी यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवरांनी आर्थिक योगदान दिले त्यात सामाजिक कार्यकर्ते वामन तुरणकार, पंचायत समिती राजुरा च्या सभापती मुमताज अब्दुल जावेद,
जय मातादी ट्रान्सपोर्ट राजुरा, जिल्हा परिषद हायस्कूल विहिरगाव चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेश रामराव बोभाटे , जेसीआई राजुरा रॉयल्सच्या फाउंडर प्रेसिडेंट जयश्री शेंडे, जेसी सुनंदा तुंबडे ,जेसी राखी यमसनिवार आक्सापूर येथील शिक्षिका सुशीला पोरेड्डीवार यांनी सहकार्य केली.या कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित होते.