वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून डब्ल्यू ई सी एस द्वारे वटवृक्ष रोपण कार्यक्रमाचा शुभारंभ
तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे
अमरावती/चांदूर बाजार (कृष्णापुर):- वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (वेक्स), सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था टोंगलाबाद मासोद, प्रहार पक्ष तालुका चांदुर बाजार, Fogsy-,OBGY अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आज दि. 24 जुनं, रोजी कुरळ, टोंगलाबाद परिसरात वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्ष रोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . पुढे टप्प्याटपप्याने नियोजित जागी वृक्ष लागवड केल्या जाणार आहे.
साधारणत गावांमध्ये एखाद दुसराच वटवृक्ष आढळतो. तेव्हा गुणकारी व विशाल अशा वृक्षा ची संख्या वाढावी याकरिता आज वटपौर्णिमेचे औचित्य साधत दर वर्षी एका दुसऱ्या झाडाची पूजा करण्या सोबतच यानिमित्ताने नवीन वृक्ष लावून स्त्रियांनी पर्यावरण समतोल राखण्यासआपला हातभार लावावा या बाबतीत जनजागृती करण्यात आली. वेक्स ही संस्था पर्यावरण संवर्धनात अग्रेसर अशी संस्था आहे. तेव्हा यापुढे ही ग्रामीण भागात अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
सध्या कोविड परिस्थिती व नियम बघता गर्दी टाळण्यासाठी जास्त लोकांना निमंत्रित करणे शक्य नसल्यामुळे छोटेखानी कार्यक्रम आयोजित केल्या गेला. सदर कार्यक्रमाच्या नियोजना करिता टोंगलाबाद मासोद परिसरात आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचे देखील मार्गदर्शन लाभले..
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ. नयनाताई कडु , वेक्स अध्यक्ष प्रा. डॉ. अंजली देशमुख, डॉ मिनल देशमुख (अध्यक्ष, OBGY society) डॉक्टर शलाका बारी संतोष किटुकले, (चांदुर बाजार तालुका अध्यक्ष, प्रहार,) ,
प्रा. डॉ. मंजुषा वाठ (समन्वयक, वटवृक्ष रोपण कार्यक्रम) वेक्स चे सचिव, डॉ. जयंत वडतकर, उपाध्यक्ष, डॉ श्रीकांत वऱ्हेकर, सदस्य मनिष ढाकुलकर, तसेच वनमाला ताई गणेशकर, व सौ सुनीता झिंगरे पंचायत समिती सदस्य चांदूरबाजार. कथे साहेब सामाजिक वनीकरण विभाग, संजय वाकोडे उपसरपंच मासोद ,पोलीस पाटील सौ. मोहोड ताई कुरळ पुर्णा. पल्लवी कडू, संदीप मोहोड संगीता मोहोड प्रीती मोहोड ,वर्षा मोहोड, वैशाली मोरे, प्रणाली ठाकरे, माधुरी मोहोड, सविता मोहोड ,जयश्री देशमुख मीना मोहोड बेबीताई खारोडे व गावकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते.