राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चामोर्शीच्या वतीने भव्य निदर्शने
उपविभागिय अधिकारी कार्यालय चामोर्शी यांच्या कडे विविध मागण्यांचे निवेदन केले सादर
✍️सुखसागर झाडे गडचिरोली:-
आज दिनांक २४/०६/२०२१ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ च्या वतीने उपविभागीय कार्यालय चामोर्शी येथे समस्त ओबीसी बांधवांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन सादर करण्यात आले.
४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार राज्यात २७ % ओबीसी आरक्षण संपुष्टात आणल्या गेले. एकिकडे ओबीसींच्या नावाखाली मते घ्यायची, भले-मोठे मोर्चे काढायचे आंदोलन करायची आणी लोकांना भुलथाप द्यायचे आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचीत ओबीसी आरक्षण संपुष्टात आणायचे. या विरुद्ध राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चामोर्शी च्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करीत. आपल्या न्याय व हक्कांसाठी उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब चामोर्शी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिवाकर कोहळे, शिवराम मोंगरकर, संजय लोणारे, राकेश खेवले, गोकुळदास झाडे, कवळू येमजेलवार, सदाशिव वाघरे, वामन किणेकर, अतुल दुधबळे, आष्टी वरून कपिलजी पाल अचूत्त कुनघाडकर, संतोष चावरे, वासुदेव लोथे, नामुदेव कापगते, दिलीप सोमनकार, दिवाकर बुरे, निलेश वासेकर, मिथुन कुनघाडकर, देवानंद लोनगाडगे राजेश नांदगिरवार, उमाकांत बुरे, विनोद वैरागडे, दिलीप चीतारकर, सुनील कुकडकर व इतर बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थितीत होते.