कोविड लसीकरणाला सोनापूर वासीय ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोविड लसीकरण शिबीराचा लाभ घेऊन, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे – जि. प. सदस्या विद्याताई आभारे
✍️ गडचिरोली सुखसागर झाडे:-
चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत सोनापूर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनापूर, येथे सुरू करण्यात आलेल्या, कोविड19 व्याक्सीन लसीकरण शिबिराचे शुभारंभ प्रसंगी सौ विद्याताई आभारे यांनी गावातील सर्व नागरिकांनी ग्राम पंचायतने आयोजित केलेल्या शिबिराचे लाभ घेत, 100% सोनापूर गाव कोरोना मुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी 18 ते 44 व 45 ते 60 वर्षा पर्यंत सर्वांनी न घाबरता 100% लस घेऊन सहकार्य करावे.असे आवाहन यावेळी केले, याप्रसंगी सौ गॊपिका टेकाम सरपंच, उपसरपंच श्री शेषराव कोहळे, श्री अनिल उंदिरवाडे सदस्य, श्री. उत्तम कोवे सदस्य, श्री संदीप सोयाम, श्री चंद्रशेखर दुधबावरे पो पा., सौ सविता कुंनघाडकर सदस्य, श्रीमती निमगडे ग्रामसेविका, रोशन मोगरकर BSW क्षेत्र कार्यकर्ता डॉ. रोहनकर सर, गीता धकाते मॅडम ANM, श्री नकटुजी प्रधान सर, श्री धोडरे सर मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत सुरवात केली, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव येथील टीम श्री विठ्ठल करमासे आरोग्य सेवक, साईनाथ मंडावार, प्रगती खोब्रागडे आरोग्य सेविका, कोतवालीवाले आरोग्य सेविका, सौ सातपुते उमेद कृषी सखी यांनी सहकार्य केले, आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्या साठी ग्राम पंचायत प्रशासनाने शुभेच्छा दिल्या व आभार मानले. एकूण 70 ग्रामस्थांनी लसीकरण करून उस्फुर्त सहभाग घेतला.