आय वीटनेस “वटपौर्णिमा”
भारतीय संस्कृतीत सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंडपीपरी तालुक्यातील वढोलीत सुषमा कुंभारे, सुचिता माडुरवार, संध्या उत्तरवार, संगीता माडुरवार या महिला एकत्र येत घरीच वडाचे झाड लावून पूजा करताना.