पळसगांव परिसरात तीन वाघाची दहशत
वाघ बघण्यासाठी गावकरी जमाव
तालुका प्रतिनिधी चिमूर.
पळसगांव (पिपर्डा )ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पळसगांव येथे गावला लागून असलेल्या झुडपात ३ वाघाचा वावर वाढला आहे. आज गावकरी सकाळी तलाव शेजारी सौचालय करिता गेले असता वाघाने दोन वेक्तीचा अंगावर झडप घातली असता एक चरनदास दादाजी बन्सोड हे जखमी झाला असून मोहूले यांचा बैल वाघाने फस्त केला आहे त्या मुळे वाघ त्या ठिकाणी मांडून होता,तीन वाघा पैकी २ बछडे जंगलाच्या दिशेने पळाले मात्र १ वाघ मात्र गावशेजार ठाण मांडून बसला आहे,अनेक गावकऱ्यांनी वाघ पाहिल्याचा दावा केला आहे. यामुळे या परिसरामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.वाघाला पिटाळून लावण्यासाठी तासाच्या आवाजात वाजविणाऱ्या वाजनत्री वर सुद्धा वाघाने झडप घातली आहे मात्र वेळीच वाजा टाकून पळाला मुळे वाजनत्री सुखरूप आहेत.अनेक दिवसानंतर या गावालगत वाघ सतत दिसत असल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन हंगामाच्या दिवसात वाघोबा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाणेही आता धोकादायक होऊन बसले आहे.या वेळी वाघ कृती दल,वनविभागाच्या वनरक्षक, वनकर्मचारी या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र खबरदारीसाठी काय पावले उचलणार, हे मात्र कळलेले नाही.