मयत सिद्राम मोरे यांच्या मारेकऱ्यांवर गुन्हा नोंदवून अटक करण्यासाठी पिडीत कुटूंब उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर उपोषणाला..
विशेष,प्रतिनिधी/बाबुराव बोरोळे
लातूर :- जळकोट तालुक्यातील रामपूर तांडयात राहणाऱ्या मागासवर्गीयातील मांग जातीच्या सिद्राम मोरे यास या तांड्यातील चौघानी संगनमत करून मासे पकडण्याचे कारण पूढे करुन 10 जून 2021 रोजी दुपारी मयत व त्यांची पत्नि जेवण करत बसले असताना घरातून लक्ष्मण राठोड, पंडीत आडे, जैयतालाल आडे जात लमान यांनी बोलावून नेहले व त्यांच्या जवळील एक लाख रोख रक्कम काढून घेवून त्यास दोन्ही पायावर जबर मारहान करून तळयात टाकले त्यात सिद्रामचा मृत्यु झाला आहे.असी तक्रार पोलिस ठाणे जळकोट यांना देण्यास गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता त्यांना पोलिस ठाण्यातून हाकलून दिले. जळकोटचे पोलिस मयत कुटूंबास न्याय देत नाहीत म्हणून मयत सिद्राम मोरे यांच्या पत्नि श्रीमती लक्ष्मीबाई सिद्राम मोरे व त्यांचा मुलगा बापूराव सिद्राम मोरे दोघे जन उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या कार्यालया समोर दि 22/6/2021 पासून उपोषणास बसले आहेत. लमान जातीच्या चौघानी सिद्राम मोरे यास जीवासी मारू पिडीत कुटूंबावर अन्याय केले असतानाच जळकोटच्या तानाशाही पोलिसांनी त्या पिडीत महिलेची तक्रार न घेता त्या कुटूंबावर उपोषण करण्याची वेळ आणून दुसरा अन्याय केल्याने जळकोटच्या तानाशाही पोलिसांचा समाजातून धिक्कार करण्यात येत आहे.