लाखो रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यास टाळाटाळ

0
694

दोषारोप १ ते ४ चा प्रस्ताव सादर करण्याचे दुसऱ्यांदा गटविकास अधिकाऱ्यांना आदेश

 

  Impact 24 news

अकोला जिल्हा प्रतिनिधी/मुकेश हातोले

अकोला : पातुर तालुक्यातील सावरगाव झरंडी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये सचिव पी पी चव्हाण यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्यांनी दहा लाख ३४ हजार रुपयांचा अपहार केल्यामुळे त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार असून, विभागीय खातेनिहाय चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार अपहार केलेल्या दहा लाख ३४ हजार पैकी रिकवरीचे जवळ पाच लाख रुपयांचा भरणा केल्याची माहिती मिळाली आहे. सावरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन तसेच झरंडी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले सचिव पी पी चव्हाण यांनी पाणी फाउंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखांचा पारितोषक धनादेशाच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारचे कामे न करता कागदोपत्री कामे दाखवून रकमेचा अपहार केल्याचा आरोप सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार बळीराम ताले यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने ताले यांनी १० मे रोजी पातुर प. स. च्या आवारात “आत्मदहन” करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ताले यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आणि सचिव पी पी चव्हान यांच्यावर कारवाई करण्यास गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवेदनातून केला होता. कारवाई न झाल्यास आयुक्त कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता. सदर प्रकरणाची दखल अमरावती विभागीय आयुक्तांनी घेतली आणि कारवाई करण्याचे आदेश अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे. त्या आदेशानुसार सचिव पी पी चव्हाण यांचा दोषारोप १ ते ४ चा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र द्वारे दिले आहे.

 

गटविकास अधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे

अहवालानुसार प्रस्तुत प्रकरणी जबाबदार दिसून येणाऱ्या सचिव पी पी चव्हाण यांच्याविरुद्ध पातूरच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून खाते चौकशीचा प्रस्ताव प्राप्त झाला नसून, दोषारोप पत्र प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले होते. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यावर पत्रद्वारा ताशेरे ओढले आहे.

१५ ऑक्टोंबर २०२० रोजी चौकशी करून अहवाल समितीने कार्यालयास सादर केला आहे. सदर अहवालामध्ये दहा लाख ३४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले, आठ महिन्याचा कालावधी उलटूनही कारवाई केली नाही, कारवाई न झाल्यास मी आयुक्त कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करणार आहे.

विजयकुमार ताले तक्रार कर्ता

 

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

सचिव पी पी चव्हाण यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश दिले होते परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली त्यामुळे दुसर्‍यांदा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here