जिल्हा परिषद शाळा राजुरा बाजार येथील शाळा दुरुस्तीचा भूमिपूजन सोहळा संपन्न
वरूड तालुका प्रतिनिधी✍️ निलेश निंबाळकर☎️ ७७४३९०९५०७
अमरावती / वरूड : जिल्हा परिषद शाळा राजुरा बाजार च्या शाळा दुरुस्ती चा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 22 जून 2021 रोजी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सदस्या सौ.सिंधु करनाके यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर शाळा दुरुस्ती करिता 2 लक्ष 65 हजार 813 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी वरुड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, जिल्हा सेवादल महासचिव सुधाकर दोड, बाबाराव भोंड, राजुरा बाजार चे सरपंच निलेश धुर्वे, उपसरपंच प्रशांत बहुरूपी, बाबाराव मांगुळकर, डॉ.विजय बहुरूपी, ग्रामपंचायत सदस्य मनोहर भोंडे, जया निकम, रविंद्र जोगेकर, किशोर गोमकाळे, अरुणा बहुरूपी, विद्या कुयटे, रजनी भोंडे, प्रतिभा दाभाडे, कल्पना डाफे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविण बहुरूपी, रामचंद्र बहुरूपी, प्रणव यावले आदी उपस्थित होते.