हेल्पींग हॅन्ड कडुन राजू-याच्या पुष्पाबाईला मदत !
चंद्रपूर/राजूरा विशेष प्रतिनिधी.✍🏻 किरण घाटे :- अतिदुर्गम भागातील राजूरा येथील पुष्पाबाई ईरकुलवार नावाची ही महिला मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते.
तीचे घराचे छत कौलारु असुन ते पावसाळ्याच्या दिवसात गळते तेव्हा तीची ही गरज लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जाेपासत हेल्पींग हॅन्ड राजुरा या सेवा भावी (महीला )संस्थेने तीला घरासाठी फाडीची मदत केली .या शिवाय याच संस्थेने महा कोरोना संकटात कोरोना पिडीतांसाठी भोजनदानाची व्यवस्था केली .सदरहु उपक्रमात राजू-याच्या स्नेहा चांडक, वज्रमाला बोलमवार ,सुनिता जमदाडे, कृत्तिका सोनटक्के, रजनी शर्मा, स्वरुपा झंवर, भावना रागीट, अमृता धोटे संतोष झवर, लता चांडक,रचना नावंदर, कंचन चांडक , रमा ऐटलावार, सीमा कलसे ,बाळ सराफ ,बोर्डेवार यांचे योगदान माेलाचे ठरले आहे .दरम्यान सामाजिक कार्यात हेल्पींग हँड ही संस्था नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.