मजुरांच्या मागणीला शिव क्रांती कामगार संघटनेचा पाठींबा
मजुरांचे वेतन दोन-तीन दिवसात करणार कंपनीच्या अधिकाऱ्याचे आश्वासन
Impact 24 news
तालुका प्रतिनिधी/पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ/झरी जामणी :- झरी तालुक्यातील सद्याच्या घडीला मुकुटबन येथे आर.सी. सी.एल.या कंपनीचे बाधकाम चालू आहे.हे काम मागील तीन वर्षांपासुन काम चालू असुन या बाधकामाचे विविध छोट्या- मोठ्या कंपनीने ठेके घेतलेले असुन यातीलच एक कंपनी हाजी बाबा इन्फ्रा व बिल्डमेंट या कंपनीने देखील ठेका घेतला आहे. मात्र आता हाजी बाबा इन्फ्रा ही कंपनी गेली ४ महिन्या पासून कामगार वर्गाचे पगार केले नाही त्या निमित्त दि. २१ जुन २०२१ ला मुकुटबन आर सि सि पि एल कंपणी गेट क्र १ च्या समोर कामगाराणी वेतन मागणीसाठी आदोलन छोडले होते आणी हाजी बाबा इन्फ्रा या कंपनीच्या लहान ठेकेदारांनी धरणा आंदोलन करून कामगाराचे बाकी असलेले पगार लवकरात लवकर करा अशी मागणी केली होती.
या मागणीसाठी आज शिव क्रांती कामगार संघटनेने पाठींबा देऊन कामगाराचे लवकरात लवकर पगार करा अशी मागणी आर.सी. सी.पी.एल.कपंणीतील वरिष्ठ अधिकारी यांनी आंदोलनाला भेट देउन असे आश्वासन दिले आहे की,असलेली मागणी ही लवकरात लवकर पूर्ण करू येत्या तीन-चार दिवसात पूर्ण कामगाराची मागणी पूर्ण करू अशे आश्वासन दिले आहे.या आश्वासणाच्या नंतर वेतन मागणीचे आंदोलन मागे घेण्यात आले.