सावधान! नगर जिल्हात नागरिकांना मोठा इशारा , पुन्हा रुग्ण वाढले.
अहमदनगर / प्रतिनिधी ✍🏻ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर :- (दिनांक २१/६) काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत तब्बल ५९४रुग्णाची ची वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या आता पुन्हा २ हजार ९५८ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात काल ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७२,
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५४
आणि अँटीजेन चाचणीत १६८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३,
अकोले ०३, जामखेड ०४, कर्जत ०२,
कोपरगाव ०४, नगर ग्रा. ०७, पारनेर ०१,
पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहुरी ०२,
संगमनेर ३५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३,
कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१
अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित
आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६,
अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत ०३,
कोपरगाव ०३, नगर ग्रा.०८, नेवासा ०९,
पारनेर २५, पाथर्डी २१, राहाता १८२,
राहुरी १३, संगमनेर १२, शेवगाव २५,
श्रीगोंदा २५ आणि श्रीरामपूर १८ अशा
रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १६८ जण बाधित
आढळुन आले. मनपा ०१, अकोले १८,
जामखेड ०६, कर्जत ११, कोपरगाव ०८,
नगर ग्रा. ११, नेवासा ०२, पारनेर १२,
पाथर्डी २१, राहाता २५, राहुरी १३, संगमनेर ०७,
शेवगाव १०, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०६
आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
अकोले ३३, जामखेड ४४, कर्जत २६,
कोपरगाव ३९, नेवासा २३, पारनेर ५५,
पाथर्डी ३८, राहता १७, राहुरी ५३, संगमनेर ३४,
शेवगाव २८, श्रीगोंदा १६६, श्रीरामपूर ३०
आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:२,६७,४५७
उपचार सुरू असलेले रूग्ण:२९५८
पोर्टलवरील मृत्यू नोंद:५६६७
एकूण रूग्ण संख्या:२,७६,०८२
जिल्ह्यात मागील आठवड्यात लॉक डाऊन संपले असले तरी घटनारी रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दुसरी लाट राहता तालुक्यात चालू झाली होती, आता ही आजची रुग्ण संख्या राहता तालुक्यात दोनशे च्या वर पोहचली आहे.ही बाब अत्यंत सावधानी चा इशारा देणारी आहे.नागरिकांनी ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला असल्याचे चित्र आहे. भाजी बाजार , कापड दुकाने, लग्न वऱ्हाड, हॉस्पिटल्स या ठिकाणी शासनाने आखलेल्या कोणत्या ही निर्बंध याचे पालन होताना दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मते अशीच परिस्थिती राहिली तर पंधरा दिवसात मोठी लाट पुन्हा येऊ शकते. लग्न सोहळा ही खूप मोठ्या प्रमाणात पुन्हा झाले तर , प्रशासन हतबल होईल .संगमनेर सह पूर्ण जिल्ह्यात प्रचंड गर्दी रस्त्यावर दिसत असल्याचे चित्र असून याला वेळीच आळा घालावा अशी मागणी ही सामान्य नागरिक करत आहेत..