उस्मानाबाद- अमोल मुसळे
मो- 9505608508
परांडा- तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे वस्तीवर रॅपिड अँटीजन कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये 37 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. शिबिराचे नियोजन पोलिस पाटील रवींद्र तांबे यांनी केले. आरोग्यवर्धनी उपकेंद्र ताकमोडवाडी येथील आरोग्य अधिकारी डॉ संजय ठाकरे यांनी नागरिकाना समुपदेशन करून कोरोना चाचणीसाठी तयार केले .त्यामुळे लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन 37 जणांनी रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या. यातील 10 नागरिक कोरोना रुग्णाच्या संपर्कातील होते, परंतु त्यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे तांबे वस्तीवरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी डॉ संजय ठाकरे यांनी नागरिकांना विनाकारण फिरू नये तोंडाला मास्क लावावे , गर्दीच्या ठिकाणी न जाणे आदी सांगितले. यावेळी गावातील पोलिस पाटील रवींद्र तांबे, शहाजी तांबे, नाना केसकर, बाळू तांबे, सुखदेव केसकर, सतीश भिलारे, माऊली भिलारे, कौतीक तांबे, परमेश्वर तांबे, पोपट केसकर, बालाजी तांबे आदींनी शिबिरासाठी सहकार्य केले.