दारु सडवा चोरी केल्याच्या कारणांतून दोन युवकास बेदम मारहान प्रकरणात लावन्यात आलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे…
भारत चंद्रागडे यांनी आरोपाचे केले खंडन
गोंडपिपरी (सूरज माडुरवार )
गोंडपीपरी-तालुक्यातील धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडे नांदगावात एका लग्न समारंभात दारुचा सडवा चोरल्याच्या कारणाने पाच युवकांनी दोघांना बेदम मारहान करण्यात आल्याची घटना दि 16 जून बुधवार ला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली होती. याप्रकरनी धाबा पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली.
कुडे नांदगावात रविंद्र चंद्रागडे यांच्या मुलीचा (दि.१६) जून ला विवाह होता. यावेळी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान अन्नाजी नानाजी कोडापे वय (२५) वर्ष हा जेवन करण्यासाठी विवाह मंडपी गेला. असता भारत चंद्रागडे,प्रीतम तावाडे,प्रविन तावाडे,केशव तावाडे,प्रेमचंद तावाडे यांनी अन्नाजीनेच आपला दारुचा सडवा चोरला असल्याचा कारणाने वरील पाचही जणांनी बेद्दम मारहान केल्याची तक्रार धाबा पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दाखल करण्यात आली होती. यात दोघेही गंभीर जखमी झाले असता ग्रामीण रुग्नालय गोंडपिपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले . सदर प्रकरनाचा तपास धाबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुशिल धोपटे करित आहेत.
भारत चंद्रागडे हा चोर मार्गाने दारुचा व्यवसाय करतो. यापूर्वी त्याच्यावर या – ना त्या कारणाने अनेक गुन्हे दाखल आहेत. गावात दुफळी माजऊन गटा तटात दहशत पसरवितो. व लोकांना भडकविण्याचे काम करतो. असा स्पष्ट आरोप भारत चांद्रगडे यांच्यावर करण्यात आला.
सदर प्रकरण घडले तेव्हा मी माझ्या घर परिवाराचा कार्यक्रम असल्याने परिवारासोबत लग्न कार्यात व्यस्त होतो. तरी सुद्धा सदर मारहाण प्रकरणात माझा काहीएक संबंध नसताना माझ्यावर पोलीस तक्रारीत खोटे व चुकीचे आरोप लावण्यात आले.
माझ्यावर लावण्यात आलेले वरील सर्व आरोप खोटे असून यात मला विनाकारण फसविल्या जात आहे. “मी दारू पित नाही आणि विक्री सुद्धा करीत नाही!माझ्यावर कोणत्याच पोलीस स्टेशन मध्ये दारू विक्री संदर्भात गुन्हे दाखल नाहीत.मी व्यसन मुक्ती केंद्र गोंडपीपरी चा सदस्य असून कित्येक दारुड्याना व्यसनमुक्ती केंद्रात आणून दारू सोडविण्यास प्रेरित करीत आहे.”
सदर मारहाण प्रकरणात माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे व चूकीचे असल्याची माहिती आज दि.19 जून रोज शनिवारला संदीप हॉटेल गोंडपीपरी येथे आयोजीत केलेल्या पत्र परिषदेतून भारत चंद्रागडे यांनी दिली.