दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या विराेधात केले त्या दाेघांनी विकृत लिखाण !
नंतर पाेलिसां समाेर मागितली त्यांनी माफी !
चंद्रपूर विदर्भ -किरण घाटे विशेष प्रतिनिधी – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह या शिवाय अन्य वरिष्ठ नेत्यां विराेधात समाजमाध्यमांवर चंद्रपूरातील प्रवीण उपगन्लावार व आनंद खांडरे हे गेल्या काही दिवसांपासून विकृत लिखाण करीत हाेते . दरम्यान ही बाब येथील स्थानिक आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच चंद्रपूर पाेलिस स्टेशनला तक्रार नाेंदविली.ही माहिती प्रविण व आनंद यांना माहित हाेताच या दाेघांनी थेट शहरातील रामनगर पाेलिस स्टेशन गाठून नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांच्या नावे माफीनामा लिहून दिला. यापुढे आमच्या हातून अशी चुक हाेणार असे म्हणत म्हणत त्यांनी आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचीही माफी मागितली.
प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे हे मागील काही दिवसांपासून विशिष्ट पक्षांच्या नेत्यां विराेधात समाज माध्यमांवर विकृत लिखाण करीत आहे. या दाेघांना अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. पण ते समजण्यांच्या पलिकडे हाेते. दिवसें दिवस त्यांच्या भाषेचा दर्जा घसरत गेला. दि .१६ जून राेजी प्रवीण उपगन्लावार यांनी आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटूंबियां विषयी फेसबुकवर अतिशय वाईट शब्दात लिखान केले नेहमी प्रमाणे आनंद खांडरे यांनी. सुध्दा त्याच पध्दतीने आपल्या फेसबूकवर प्रतिक्रीया टाकल्या. आपले काहीच हाेणार नाही, असा समज करुन या दाेघांनीही समाज माध्यमांवर आपल्या विकृतीचे प्रदर्शन सातत्याने सुरुच ठेवले. दरम्यान याची माहिती आज शनिवारला आपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झाली. आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे,संस्थापक सदस्य जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार ,कोषाध्यक्ष भिवराज सोनी अँड.प्रतिक विराणी यांनी थेट रामनगर पाेलिस ठाणे गाठले आणि या दाेघांचीही रितसर लेखी तक्रार केली. शेवटी या दाेघांनीही सर्वासमक्ष गयावया करुन आपच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली. एवढेच नाहीत तर त्या दाेघांनी स्वतंत्रपणे ठाणेदारांना आपला माफीनामा लिहून दिला. यापुढे अशी चूक कधीही करणार नाही, अशी कबुली देखिल त्यांनी दिली.
यावेळी संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, बबन कृष्णपालिवार ,सूर्यकांत चांदेकर ,अॅड राजेश विरानी,राजेश चेडगुलवार , सिकंदर सागोरे तसेच आम आदमी पार्टी चे अनेक कार्यकर्ते पाेलिस स्टेशनला उपस्थित होते.