के.सी.पी.एल.या भ्रष्ट कन्ट्रकशन कंपनीवर तात्काळ कार्यवाही करा या मागणीसाठी रि.पा.इं.(आ) युवक आघाडी चे निदर्शने आंदोलन

0
724


.

बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी
लातूर
8788979819

उदगीर…आष्टामोड ते तीवटग्याळ पाटी या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत रस्त्याचे काम करणाऱ्या के.सी.पी.एल या कन्ट्रक्शन कंपनीकडून अवैधरित्या गौनखनिजाचे उत्खणण करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून व तसेच सदरील रस्त्याचे काम अतिशय संथगतीने करणाऱ्या या के.सी.पी.एल या कंपनीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आज दि.17/06/2021 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यलय उदगीर समोर  रि.पा.इं.(आ) युवक आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले.

अष्टामोड ते टीवटग्याल पाटी ता.उदगीर या राष्ट्रीय महामार्ग  रस्त्याचे काम कर्नाटक राज्याच्या के.सी.पी.एल या कन्ट्रक्शन कंपनीकडून गेल्या एक ते दीड वर्षपासून सुरू असून सदरील रस्ता करण्यासाठी लागणारे मुरूम, दगड ,खडक सदरील कँपनी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून सदरील रस्ता बनवण्यासाठी वापरत आहे या के.सी.पी.एल कंपनीला मा.जिल्हाधिकारी साहेब लातूर यांनी गौनखनिज उत्खनन करण्याच्या दिलेल्या मर्यादेपेक्षाही अधिक उत्खननं करून या कर्नाटक राज्यातील के.सी.पी.एल. कंपनीने महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपय महसूल बुडवून शासनाला लूटण्याचे काम केले आहे व तसेच या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने करत असताना जागोजागी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्या मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल होत असून या चिखलामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांची मोठे नुकसान होत आहे या नुकसानीला के.सी.पी.एल कंपनीला जबाबदार धरून कार्यवाही करावी व अवैधरित्या गौनखनिज उत्खनन करणाऱ्या या कंपनीवर कार्यवाही करावी या मागणीसाठी रि.पा.इं.(आ) युवक आघाडी उदगीर च्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर समोर आज भव्य निदर्शने आंदोलन करण्यात आले व येत्या पंधरा दिवसामध्ये सदरील भ्रष्ट कंपनीवर कारवाई न झाल्यास येत्या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे रि.पा.इं(आ) उदगीर चे तालुकाध्यक्ष ऍड.प्रफुल्लकुमार  उदगीरकर,रि.पा.इं.(आ) युवक आघाडी चे जिल्हासरचिटनीस सुशीलकुमार शिंदे , नितीन गायकवाड, राहुल कांबळे,रवी बनसोडे,अतुल कांबळे,प्रदीप महापुरे,संजय बिरादार, सचिन गायकवाड,बालाजी कांबळे,नरेश चांदे, प्रफुल्ल कांबळे, पुरंदर बोडके, सचिन मादळे, आकाश विटकर यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here