दोन भाजपा नगरसेवक अपात्र, नगरविकास मंत्र्यांची कारवाई

0
704

दोन भाजपा नगरसेवक अपात्र, नगरविकास मंत्र्यांची कारवाई

लातूर उपजिल्हा प्रतिनिधी/ लातूर
ओमकार सरदेशमुख – ९८२३३३१८५४ : औसा (लातूर): कार्यालयाला टाळे लावून कामकाजाला अडथळा आणणे व पाण्याच्या टाकीवर चढून पाणीपुरवठ्यात अडथळा आणल्याप्रकरणी औसा पालिकेतील भाजपाचे गटनेते सुनिल उटगे व नगरसेवक उन्मेश वागदरे यांना अपात्र ठरविले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई करत आदेशाच्या तारखेपासून पुढील पाच वर्षे त्यांना पालिका सदस्य अथवा इतर स्थानिक प्राधिकरणाचा सभासद होण्यास अपात्र ठरविले आहे. नगरविकास मंत्र्यांच्या या आदेशाने भाजपाच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या आधी नगराध्यक्ष अफसर शेख यांना अपात्र करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सुनिल उटगे यांनाच अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
नगरविकास मंत्र्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, औसा पालिकेचे सदस्य सुनिल उटगे व उन्मेश वागदरे यांनी १४ जून २०१८ रोजी पालिकेच्या कार्यालयात गोंधळ घालून पालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे पालिकेच्या आणि नागरिकांच्या आवश्यक कामात आडथळा निर्माण झाला. त्याचप्रमाणे या दोघांनी ६ जुलै २०१८ रोजी तहसील कार्यालयाजवळच्या जलकुंभावर चढून त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. त्यामुळे पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊन चार तास पाणी पुरवठ्यात खंड पडला. या प्रकरणी नगराध्यक्षांनी उभयतांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी खुलासाही सादर केला. या खुलाशाला सभेमध्ये वाचन करुन त्याला अमान्य करुन त्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सादर केलेला अहवाल शासनाला देण्यात आला. यात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या अहवालावरुन व प्रकाशित झालेल्या बातम्या, फोटोवरुन सुनिल उटगे व उन्मेश वागदरे हे कार्यालयाच्या जिन्यावर बसून गेटला कुलुप लाऊन बसलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे ते जलकुंभावर चढून कार्यकर्त्यांसह गोंधळ घालून पाणी पुरवठा करण्यास आडथळा करीत असल्याचे नमुद आहे. या सर्व बाबींवर लातूर जिल्हाधिकारी यांनी २८ डिसेंबर २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्यास सांगितले असता सुनावणीच्या वेळी संधी दिली असतानाही त्यांनी खुलासा सादर केला नाही.
त्यामुळे दोघांनीही बचावाची संधी गमावली याबाबात मा. उच्च न्यायालयात रीट याचीका दाखल केल्या होत्या त्यानुसार विहित कालावधीत निर्णय घेण्याचे आदेश असल्याने नगरविकास मंत्र्यांनी उटगे व वागदरे यांना अपात्र करीत आदेशाच्या तारखेपासुन पाच वर्षे पालिका सदस्य व इतर स्थानिक प्राधिकारणाचा सदस्य होण्यास अपात्र ठरविले आहे. युती सरकाच्या काळात डॉ,. अफसर शेख यांच्यावर अपात्रतेसाठी पुढाकार घेतलेल्या सुनिल उटगे यांनाच अपात्र करुन शेख यांनी बदला घेतल्याची चर्चा शहरात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here