भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन
पांढरकवडा तालुका प्रतिनिधी गुरूबचनसिंग जुनी
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. चंदीगढमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी त्यांची ऑक्सिजन पातळी खाली आली आणि त्यांना तापही आला होता. यांनतर त्यांना सामान्य आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. अखेर त्यांनी मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री साडे अकरच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मिल्खा सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुवर्णपदके प्राप्त केली. भारताचा पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करत शोक भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान आपण एक महान खेळाडू गमावला आहे. त्यांची दैदिप्यमान कामगिरी नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.