चिंतलधाबा येथे भारत नेवारे यांचा परत दूसऱ्या लाॅकडाऊन मध्ये शिक्षणाचा उपक्रम सुरू…
चिंतलधाबा (पोंभुर्णा), प्रतिनिधी : तालुक्यातील चिंतलधाबा गावातील युवक भारत बाळू नेवारे याने परत दूसऱ्या लाॅकडाऊन मध्ये नि:शूल्क शिकवणी वर्ग सुरू केले. लॉकडाऊन मूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरीब होतकरू विद्यार्थांची शैक्षणिक रुची कमी होऊ नये याकरिता भारत ने परत गावातील विद्यार्थ्यांचे शिकवणी सुरु केले.
अशातच गरीब, मजूर वर्गातील पालक आपल्या पाल्यांची शिकवणीची फी भरू शकत नाही. यामूळे गरीब मूलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पहील्या लॉकडाऊन प्रमाणे दूसऱ्या लाॅकडाऊन मध्ये सुद्धा १ जून पासून गावातच भारत नेवारे याने निशूल्क शिकवणी वर्ग सुरू केले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून सदर अभिनव उपक्रम सुरू आहे. शाळा बंद असल्याने मुलं शिक्षणापासून लांब जातात. याकरिता या भारतच्या अभिनव शिकवणी उपक्रमाने खेळीमेळीच्या वातावरणात मुलांची आता चांगलीच प्रगती दिसून येत आहे. या उपक्रमाचे गावात कौतुक केले जात आहे.