स्टेला मॉरीस कॉन्व्हेन्ट स्कूल येथील गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा!
प्रवीण वाघमारे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रयत्न करण्याची विनंती अर्जातून केली मागणी
बामणवाडा/राजुरा, अमोल राऊत (१८ जून) : बामणवाडा येथील स्टेला मॉरीस कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये मागील २० वर्षांपासून शैक्षणिक व्यवसाय सुरु आहे. मात्र आजपर्यंत या कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात आली नाही. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सदर कॉन्व्हेंट तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची प्रवेश तसेच शैक्षणिक फी माफ करण्यात यावी असे ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना विनंती अर्ज द्वारे स्थानिक कार्यकर्ता प्रवीण वाघमारे यांनी मागणी केली आहे.
कोव्हिड लॉकडाउन मुळे गरीब, शेतकरी व मजूर वर्गाचे कंबरडे मोडले आहे. यामुळे त्यांच्यापूढे आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण देणे आर्थिक मर्यादेच्या पलीकडचे झाले आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश व संपूर्ण फी माफ करण्यात यावी. यासाठी बामणवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रयत्न करून गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा द्यावा अशी अशी मागणी विनंती अर्जातून प्रवीण वाघमारे यांनी केली आहे.