कोठारी – तोहोगाव मार्गावरील यातना संपता संपेना!
परसोडी पुलावरील पर्यायी मार्गावर ट्रक फसला ; पुन्हा तिसऱ्यांदा मार्ग बंद
प्रतिनिधी :- राज जुनघरे
कोठारी/ चंद्रपूर/ विदर्भ :- कोठारी, तोहोगाव, लाठी या तेलंगणा राज्यास जोडनारा मार्ग जुन महिन्याच्या सुरुवाती पासून सतत बंद पडण्याच्या श्रृंखलेत अडकलेला आहे.आजही तिच प्रचिती आली असून अवजड सामानाची वाहतूक करीत असलेला ट्रक फसल्याने तिसऱ्या दा वाहतूक बंद पडली आहे.
जुन महिन्याच्या सुरुवाती पासूनच परसोडी, पाचगाव मार्ग वाहुन जाणार ही शंका वर्तविली जात असता. १२ जुन रोजी मुसळधार पावसामुळे मार्ग वाहुन गेला. डागडुजी करून मार्ग सुरळीत करून देत नाही तोच १५ जुन रोजी परत मार्ग वाहुन गेला. सततच्या मार्ग बंद होण्याची साखडी बघता गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाची लखतरे वेशीला टांगल्या गेली. व बांधकाम उपविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. मार्ग बंद पडण्याच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले. विभागीय उपअभियंता यांनी घटना स्थळाला भेट देऊन पुरेसे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे पाईप टाकून वाहतूक सुरू करण्याच्या सुचना दिल्या. मात्र कंत्राटदाराने मोठे पाईप टाकले आणि वरून मातिचा भरणा केला. परिणामी किरकोळ आलेल्या पावसाने मातीचे चिखलात रूपांतर झाले. आणि आज सकाळी तोहोगाव कडुन कोठारी कडे येणारा मालवाहू ट्रक अवजड असल्या कारणाने फसला. आणि मार्ग बंद होण्याच्या श्रृंखलेतील तिसरा टप्पा गाठला. यामुळे आजसुद्धा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नौकरी साठी, शासकीय कामासाठी, शेती उपयोगी साहित्य खरेदी साठी,व आवश्यक महत्वाच्या कामासाठी जाणार्याची तारांबळ उडाली. मार्ग बंद पडण्याच्या साखळीने या भागातील प्रवासी नागरिकांत संताप अनावर होत असून एकदाच या मार्गाचे सोक्षमोक्ष लावून टाकावे अशी मागणी केली आहे. संपूर्ण पावसाळ्यात वारंवार वाहतूकीस अडथळा निर्माण होत राहणार आहे. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियोजन करण्याची मार्मिक मागणी सुध्दा नागरिकांनी केली आहे.