अडेगाव खडकी रस्त्याचे खड्डे त्वरित बुजवा
सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांचे उपविभागीय अभियंता मारेगाव याना निवेदन
रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास कार्यालय समोर अदोलन करण्याचा इशारा
झरी जामनी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं गाव असलेले अडेगाव या गावात चार डोलामाईड खदानी आहेत यामुळे अडेगाव -खडकी रस्त्यावर मोठे ओव्हरलोड वाहतूक चालत असतात या वाहतूकी मुळे
अडेगाव -खडकी ते मार्ग पूर्ण खड्डेमय झाला आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आणि अनेक छोटे पूल तुटलेल्या अवसतेत आहेत यामुडे अडेगाव,खातेर,येडत,अमलोन,तेजापूर गाडेगाठ रामपूर इतर गावातील नागरिकांना या खड्डेमय रस्त्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे हाच अडेगाव- खडकी रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे सोबतच खातेरा नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम जोरदार सुरू असताना याच रस्त्यावरवरून मोठी वाहतून भविष्यात होणार आहे पण या रस्त्याची अवस्था खूप बिकट होत मोठे मोठे खड्डे पडले आहे हाच मुद्दा घेऊन अडेगाव येथील सामजिक कार्यकरते मंगेश पाचभाई यांनी उपविभागीय बांधकाम अभियंता याना लेखी निवेदन देत रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली यावेळी निवेदन देताना गणेश पेटकर ,राहुल ठाकूर,विजय लालसरे आदी सहकारी उपस्तीत होते