इथेच प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करा ;अन्यथा लढा संघटनेचे धरणे आंदोलन…
जिल्हाधिकारी कार्यलयात ठिय्या धरणे आंदोलन
अमरावती जिल्हा प्रतिनिधी ✍🏻देवेंद्र भोंडे
अमरावती/तिवसा :- शेतीचे प्रकरण म्हटलं की महसूल विभाग समोर येतो.तिवसा तहसील कार्यालयात मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.या काळात शेतकऱ्यांनी या कार्यालयात अनेक वेळा चकरा मारल्यात. कधी तारखांसाठी तर कधी पाठपुराव्या साठी.या कार्यालयात येण्या जाण्यासाठी बराच पैसा देखील खर्च झाला पण निकाल लागत नव्हता. अनेक शेतकऱ्यांना या हंगामात शेतात जाता सुद्धा येत नाही तसेच sdo नि आठ महिन्या पासून निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही.हाच मुद्दा लढा संघटनेने जाणीवपूर्वक तहसीलदार यांच्या समोर २ जून ला मांडला आणि १४ जुन ला याच मुद्द्याला समोर ठेऊन धरणे आंदोलन करणार हे जाहीर केलं. आंदोलनाची तारीख येऊन सुद्धा तहसीलदार यांच्या कडून लढा संघटनेला दिलेल्या निवेदानाचे उत्तर दिल्या गेले नाही त्या मुळे लढा संघटनेचे आंदोलक नाराज होते.
तहसीलदार यांना धरणे द्यायच्या आधी त्यांच्या कार्यलयात जाऊन तिवसा तहसीलदार यांना आमच्या पत्राचे साधे उत्तर सुध्दा तुम्ही दिले नाही याची विचारणा केली तर त्यावर तहसीलदार म्हणाले की मी काही प्रकरण निकाली काढण्यासाठी नोटीसा पाठविल्या आहेत आणि निपटारा सुरू आहे.
यावर लढा संघटनेच्या संजय देशमुख यांनी मागील दोन वर्षात काही न काही प्रकरणे निपटायला पाहिजे होती असे विचारले असता तहसीलदार म्हणाले की मी एकटाच आहो माझ्या खाली नायब तहसीलदार कुणीच नाही. त्यावर कार्यकर्ते चिडले,व म्हणाले की ते आमचे काम नाही तुम्ही जिल्हाधिकारी यांना सांगा. संजय देशमुख म्हणाले की माझा आधीकार असता तर १० नायब तहसीलदार आणले असते. ज्यांच्या कडे अधिकार आहेत त्यांना म्हणा. आम्हाला आमच्या शेतकरयांच्या प्रकरणांचा निपटारा करा .जर या कार्यलयाकडून शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा निपटारा नाही झाला तर लढा संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करेल हा इशारा देखील देण्यात आला.या धरणे आंदोलनाच्या वेळेस अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळेस लढा संघटने चे अध्यक्ष संजय देशमुख,योगेश लोखंडे, मोहन आवारे,विजय डोंगरे,अंकुश गायकवाड, विजय सपाटे, दिलीप घुरडे, नरेंद्र काकडे,लोकेश लवणकर,दिनेश ठाकरे,राजेंद्र भोम्बे, बाळा देशमुख, अमोल साबळे,सुरज कुरजेकर,मुरली मदनकर,विजय उंदरे,आदर्श साबळे,पांढरी राव नागपुरे,दत्ता धसकट,आनंद उमप,रमेश गावणार,भूषण गाढे,समीर लांडगे,सचिन गायकवाड, निलेश तोत्रे, मंगेश ठाकूर,विजयेंद्र शिरपूरकर,अरविंद विरुळकर आदि उपस्थित होते..