लातूरची सकारात्मक पत्रकारिता सर्वाना आदर्श-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

0
802

लातूरची सकारात्मक पत्रकारिता सर्वाना आदर्श-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

जिल्हा विशेष प्रतिनिधि /जीवन भोसले

लातूर – जिल्ह्यातील पत्रकारिता ही संकट समयी टीका करणारी नसून जनतेच्या समस्या सोडविणारी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेक संकटाचे प्रसंग आले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यावर नकारात्मक टीका न करता या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. शिवाय जनतेच्या मदतीला पत्रकार धावून आले हे कार्य सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगुन कोरोनाचे संकट आणखी टळले नसून पत्रकारांनी जनतेत जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्ह्यतील नूतन पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र, डायरी,दिनदर्शिका व कोरोना संकटामुळे मास्कचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले; याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, दुर्ग अभियंता प्रशांत स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की कोरोना महामारीच्या काळामध्ये पत्रकारानी प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण आणू शकलो. पत्रकारांनी कोरोनाच्या बाबतीत पॉझिटिव्ह लिखाण केलं त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणात दूर झाली असेच समाज जागृतीचे काम पुढील काळात ती करावे असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांनी पत्रकारांच्या समस्या मांडत मराठवाडा विभागाचे अधिवेशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच लातूर जिल्ह्यात आयोजित केले जाईल, अशी माहिती देत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येत असून यामधील प्रमुख मागणी पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ हवा यासाठी संघटनेने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कोरोना काळातील लातूरच्या पत्रकारांच्या सकारात्मक कामाचे कौतुक करीत पत्रकारांसाठी योग्य ती मदत आपण करू, पत्रकारांनी समाजासाठी योग्य त्या सूचना आपणापर्यत पोहचविण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांची यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे व आभार शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे मराठवाडा सचिव दिपरत्न निलंगेकर, मराठवाडा उपाध्यक्ष दयानंद जडे, जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, शहराध्यक्ष महादेव डोंबे, श्रीधर स्वामी, सुधाकर फुले, हारुण मोमीन, नितीन भाले, लातूर तालुका अध्यक्ष कलीम पठाण, रेनापुर तालुका अध्यक्ष बालाजी कटके, औसा तालुका अध्यक्ष आसिफ पटेल, जळकोट तालुका अध्यक्ष सतीश बिराजदार, शिरूर आनंतपाळ तालुका अध्यक्ष कुंभार,प्रदीप कवाळे,आदीसह जिल्ह्यातील पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here