” रक्तसाठ्याचा तुटवडा ” रक्तदानासाठी सरसावले युवक
नांदा येथे रक्तदान शिबिर
आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते उद्घाटन
आवाळपुर-
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने नांदा युवक मित्रमंडळ आणि ग्रामपंचायत नांदा यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १३) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार टाकून रक्तदान शिबिराचे उद् घाटन केले यावेळी ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडली होती यात लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला अशातच रक्तपेढीत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडला आहे शासन स्तरावरुन रक्तदान करण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे प्रशासनाच्या आव्हानाला दाद देत नांदा येथील युवकांनी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले यात ४४ युवकांनी रक्तदान केले असून या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे
ग्रामपंचायत सदस्य अभय मुणोत व लोकमतचे बातमीदार सतिष जमदाडे यांनी रक्तदान शिबिर घेण्याची संकल्पना ठेवली शिबिराच्या आयोजना करीता नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य रत्नाकर चटप , पुरुषोत्तम निब्रड , डाॅ. स्वप्नील चांदेकर ,नांदा ग्रामपंचायतीचे सचिव पंढरीनाथ गेडाम , दिपक खेकारे , प्रमोद साहू यांनी मोलाची मदत केली प्रवीण पोटवडे, महेश राऊत, हारून सिद्धिकी आतीष वासेकर गुरुदेव तिरनकर यांचेसह अनेकांनी सहकार्य केले
छत्री , मास्क व सॅनिटायजरचे वाटप
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला ह.प.भ. डाखरे महाराज यांचे उपस्थितीत छत्री , सॅनिटायझर , मास्क व प्रमाणपत्र देऊन रक्तदात्याचा सम्मान करत लाखमोलाचे रक्तदान केल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील युवक मित्र मंडळांनी प्रत्येक गावागावात छोटेखानी रक्तदान शिबिर आयोजित केल्यास जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा होणार नाही यावेळी शासकीय रक्तपिढी चंद्रपूरचे समाजसेवा अधीक्षक पंकज पवार , संजय गावित व जयंत पचारे यांच्या चमूने रक्त संकलन केले