अमरावती व वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे यांचे आव्हान
Impact 24 news
विशेष प्रतिनिधी/✍🏻सदानंद खंडारे
वाशिम :- युवा संस्था अंतर्गत गेल्या 34 वर्षापासून भारतातील विविध भागात व ग्रामीण भागातील मुले कामगार युवक, महिला,शेतकरी, आदिवासी अशा वंचित अपेक्षित समाज घटकांसोबत कार्य करीत आहे. या माध्यमातून अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्रातील युवक-युवती च्या विकासासाठी तसेच युवांच्या मार्फत सामाजिक विकासासाठी कार्य करीत आहे. युवानच्या माध्यमातून युवकांच्या विकासासाठी अनुभव शिक्षा केंद्रातर्फे कार्यक्रम राबवले जातात. अनुभव हा आपला गुरू आहे. अनुभव म्हणजे अनुभूती अनुभव शिक्षण पर्यायाने अनुभूतीतून शिक्षण ही संकल्पना केंद्रामार्फत अनुभव शिक्षा केंद्राच्या कार्यक्रमाप्रमाणे आहे. ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणून संपूर्ण युवावर्ग कडे पाहिले जाते. समाजव्यवस्थेत धक्का देण्याची नव्हे तर त्यात योग्य ते परिवर्तन आणण्याची ताकद युवावर्ग कडे आहे.आणि या विश्वासाने अनुभव शिक्षा केंद्रा युवा वर्गाकडे पाहते म्हणूनच त्यांच्याकडून मूल्याधारित रचनात्मक विचार आणि कृतीची अपेक्षा करते. त्यासाठी अस्तित्व असणारे व औपचारिक शिक्षण व प्रणाली गट्टी पडते आहे. हे सर्व मान्य आहे म्हणूनच औपचारिकता शिक्षण प्रणालीतून मानव घडवण्यासाठी ज्या उजावा दिसतात त्या कमी करण्याची प्रक्रिया म्हणून अनुभव शिक्षा केंद्रा हा कार्यक्रम गेले 18 वर्ष महाराष्ट्रात राबवले जात आहे. तसेच अशा युवा वर्गाची मानसिकता सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊन त्यांना मानवी मूल्यांची जोपासना करणे जागृती नागरिक बनवण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्र युवाशी जवळीक साधते. खास करून युवा व विद्यार्थी वर्गासाठी अनुभव हा एक असा जिवंत मंच आहे की, या मंचामध्ये आपण सामील होऊन आपली कोणतीही व्यक्तिगत, मानवी भावना, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा व्यक्त करण्याची संधी आहे. ही प्रक्रिया 1986 मध्ये प्रथमत दिल्ली येथे सुरू झाली. 1990 मध्ये युवा संस्थेने ही संकल्पना मुंबईमध्ये प्रत्यक्ष अंमलात आणली. परंतु हा कार्यक्रम जास्तीत जास्त युवा पर्यंत पोहचावा या उद्देशाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही राबवली जाते. या ती प्रक्रिया महाराष्ट्रातील विविध मध्ये विविध वस्त्या गावे व तथा महाविद्यालय मध्ये चालू आहे. यामध्ये अनुभव शिक्षा केंद्रा चे मूल्याधारित युवक घडावा.
यासाठी धर्मनिरपेक्षता,लिंग भावातील न्याय,सामाजिक न्याय,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,पर्यावरण न्याय,श्रमप्रतिष्ठा या मूल्याधारित युवक घडावा यासाठी अनुभव शिक्षा केंद्र काम करते. यामध्ये अनुभव शिक्षा केंद्राचे उपक्रम कार्यानुभव भेटी, प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे, उद्बोधन कार्यक्रम, युवकांशी चर्चा व इतर कार्यक्रम घेण्यात येतात. यासाठी अनुभव शिक्षा केंद्राचे तीन स्तर आहेत. त्यामध्ये अनुभव मित्र, अनुभव सहयोगी, आणि अनुभव साथी हे आहे. अनुभव शिक्षा केंद्र हे 15 ते 35 या वयोगटातील युवकांमध्ये काम करते. यासाठी अमरावती व वाशिम जिल्ह्यातील युवकांनी अनुभव शिक्षा केंद्राशी जोडावे असे आव्हान अनुभव शिक्षा केंद्रा चे जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे यांनी युवकांना आव्हान केले आहे………