माळशेज घाटात चहा ने दिले जीवदान ; कारवर कोसळली दरड
इम्पॅक्ट 24 न्यूज नेटवर्क/ ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर 13/6/21-अहमदनगर- कल्याण महामार्गावर एका कारवर परवा सायंकाळी माळशेज घाटात दरड कोसळली. अहमदनगर हून कल्याणच्या दिशेला निघालेले कारमधील दोघांना चहा पिण्याची इच्छा झाली होती. कार रस्त्याच्या कडेला उभिकरून चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली. दरवर्षी पावसात या माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. माळशेज घाट परिसरात मागील आठवड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यातच दरड कोसळून दुर्घटना घडली, परंतु सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही. चहा मुळे नरेंद्र मोदी प्रधान मंत्री झाले , आज दोन तरुणाचे प्राण वाचले. चहाची तलफ भारीच असते, सरकारी कार्यालयात दोन तास चहा ला जाणारी मंडळी ही आपण पाहतो. पण नशीब मोठी बाब आहे. देव तारी त्याला कोण मारी असेच म्हणावे लागेल.
अहमदनगर इथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दोघे गाडीने माळशेज घाटात पोहोचले. यावेळी चहा पिण्याची इच्छा झाल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमधून उतरुन चहाच्या दुकानजवळ पोहोचले असतानाच अचानक त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने मुकुंद आणि त्याचा मित्र गाडीतून उतरल्याने सुखरुप बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या दोघांनाही आला.