वराेरा चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी -सहजं सुचलं लाेकप्रिय काव्यकुंज व्यासपीठावरील सदस्या तथा सुपरिचित कवयित्रि वंदना आगलावे यांनी शब्दांकित केलेली चित्र उपक्रम अंतर्गतची लावणी काव्यरचना खास वाचकांसाठी आम्ही आज येथे देत आहाे
!!लावणी!!
आला पावसाळा
भरला बंधारा
चला गड्यांनो
लावणी करू भराभरा…,.
लावणी करण्या रोपाची
झाली लगबग सुरू
नवरा ,बायको ,पोरं
सगळेच काम करू….
त्याविना नाही
बळीराजाचं खरं
उदरनिर्वाहासाठी लागतं
करावं तेवढं बरं….
भर चिखलात बाप्पा
लावणीच्या शेतात
गुडघाभर चिखलात
पाय रोवावे लागतात……
विंचू ,इंगळी ,साप
तिथेच डोलत असतात
मित्र त्यांना मानून
गाणी सोबत गातात….
गुडघाभर पाण्यात
पोर उतरल खरं
बापाचं काम
करून रायल पूर….
एक ,एक, रोप
झाल्यावर लावून
शिवार हिरवगार होतं
बळीराजा भारी सुखावतो
-सौ वंदना आगलावे , शिक्षिका वराेरा , जि. चंद्रपूर सहजं सुचलं काव्यकुंज व्यासपीठ