तालुका प्रतिनिधी,राळेगाव
✍🏻 संजय कारवटकर
मो.7499602440
यवतमाळ :- घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील आशा सेविका आरोग्य केंद्रात जात असताना तेथील उपसरपंच मधुसूदन मोहूर्ले याने आशा सेविका गंगा कुमरे आणि कालिंदा डहाके या दोघींवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामुळे आशा सेविकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधी कडून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासल्यास प्रकार करण्याऱ्या हल्लेखोर उपसरपंच मधुसूदन मोहूर्ले यांचे पद रद्द करून त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पारवा पोलिसांनी 356 अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा..
अशी मागणी भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष सौ. संतोषी रा. वर्मा ,करुणा ताई वानखडे { आशा सेविका शेळी] ,शैलेश आडे ,रोशन बावणे, विजय मुंडाली, राजजी वर्मा,आदी पदाधिकारी उपस्थित होते..