तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे
अमरावती /चांदूर बाजार (कृष्णापुर):- वृक्षारोपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बार्टी पूणे वतीने सर्वत्र पंधरवाडा वृक्षारोपण उपक्रम राबवला जात आहे. वृक्ष हे मानवी जिवनासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. आज कोरोना काळा मध्ये सर्वात जास्त आॅक्सीजनची कमतरता भासत आहे पैसे देऊनही ती कमतरता योग्य ती पुर्ण होतांना दिसत नाही.परंतु वृक्ष हे आपल्याला निस्वार्थ पणे 24 तास मोफत ऑक्सीजन देतात.पर्यावरणा विषयी लोकांमध्ये जागृती व्हावी व पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याच अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो.
त्याच निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आज भिमटेकडी यशोदानगर अमरावती येथे मा डाॅ.कमलताई गवई यांच्या हस्ते विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली.झाडे लावने निव्वळ हेच महत्वाचे नसुन त्याच्या संवर्धनाची पुर्णतःजबाबदारी स्विकारने महत्वाचे आई डाॅ.कमलताई गवई असे प्रतिपादन करीत डॉ. कमलताई गवई यांनी उपस्थितांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देत वृक्ष लावा वृक्ष जगवा हा मंत्र दिला.
यावेळी जि.एल.आकडे,पंकज मेश्राम,अमित वानखडे बार्टी प्रकल्प संचालक अम प्रविण वासनिक वृक्ष प्रेमी स्मिता मोरे मॅडम समतादूत बार्टी शितल गजभिये , राजेश गरूड, लक्ष्मण नांदळेकर, आदी उपस्थित होते.