साने गुरुजी यांना 72 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

0
694

 

Impact 24 news

वणी : –

“शाम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो”

 

साने गुरुजींच्या आईच्या तोंडचे हे शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले स्वतःत उतरवले आणि अखेरपर्यंत आचरणात देखील आणले साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा फार प्रभाव होता. श्यामची आई या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्यांकडे हे संस्कार हस्तांतरीत झालेले आपल्याला पहायला मिळाले. पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो…मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी होते.

श्यामची आई या पुस्तकाचे लेखक व आदर्श शिक्षक एक प्रकल्पग्रस्त व्यक्तिमत्त्व साने गुरुजी हे स्वातंत्र्य चळवळीत पण कार्यरत होते.

 

 आज महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीचे वतीने साने गुरुजींच्या 72 व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या तैलचित्राला हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन केले.

यावेळी समितीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले, हिंदू स्वाभिमानी संघटक कासार सागर मुने, समनव्यक लोकसेवक अमित उपाध्ये, सदस्य इजि चैतन्य तुरविले, मधुकर हांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here