चंद्रपूरातील डेरा आंदोलनला झाला ४महिण्यांपेक्षा अधिक कालावधी !
रिमझिम पावसातही सुरुच आहे कामगारांचे आंदोलन !
प्रशासनाने नाही घेतली अद्याप दखल !
-चंद्रपूर-किरण घाटे – किमान वेतन लागू करा व सात महिण्यांचे प्रलंबित वेतन तातडीने द्या ! या प्रमुख मागण्यांसाठी येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ कंत्राटी कामगारांचे डेरा आंदाेलन सुरु असुन या आंदाेलनला ४महिण्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्याचे आंदाेलनकर्त्यांनी आज शुक्रवारला सकाळी एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीस सांगितले. जगभरात थैमान घातलेल्या महाभयानक काेराेना संकटात या कामगारांनी जीव धाेक्यात टाकुन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून सेवा दिली . अनेक मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या अमुल्य कार्यांचा गाैरव ही प्रशासनाने केला आहे .पण आजच्या परिस्थितीत त्यांना कुठल्याही प्रकारचे थकीत वेतन मिळाले नाही .त्यांचेसह त्यांचे कुटुंबावर अक्षरशा उपासमारीची पाळी आली आहे .काहींनी तर पाेटाची खळगी बुजविण्यांसाठी खासगीरुपात कर्ज उचलल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे .एंकदरीत आता आंदाेलनातील सर्वचं कामगारांच्या परिवारातील परिस्थिती खालावली असुन ते स्वता हतबल झाले आहे .केलेल्या कामांचा माेबदला त्यांना मिळायलाच हवा अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांनरुन आता उमटु लागली आहे तरं आंदोलन कर्त्यांच्या मनात प्रशासनाबाबत सतत असंतोष खदखदत असल्याचे दिसून येते. या आंदाेलनात शेकडाें कंत्राटी कामगार उतरले असुन सदरहु आंदाेलना बाबत अद्याप ताेडगा निघाला नाही .दरम्यान चंद्रपूर मनपाचे विद्यमान नगर सेवक तथा जनविकास सेनेचे सर्वेसर्वा पप्पू देशमुख यांनी वेळाेवेळी या आंदोलन कर्त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे . परंतु अद्याप शासन व प्रशासनाने या आंदाेलनाची दखल घेतली नाही. हे विशेष !