वडाळा पैकू माणिक नगर येथे नाली च्या अभावामुळे पाणी राहते साचून
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चिमूर
नगर परिषद चिमूर अंतर्गत येत असलेल्या वडाळा पैकू येथील अपना मंगल कार्यालयाचे मागील परिसरात नाल्या नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे जाणे येणे नाहक त्रास होत आहे करिता या परिसरात नाली चे बांधकाम करून पाण्याचा विल्हेवाट करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर डुकरे यांनी केली आहे
चिमूर नप च्या प्रभाग 5 मध्ये आजही किमान सुविधांचा अभाव असून नळाला पाणी येत नाही तर या वस्तीत नगर परिषद ने नाली बांधकाम न केल्यामुळे रस्त्यावर व काहींच्या घरांचे अंगणात पाणी साचून राहत आहे
यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याची शक्यता डुकरे यांनी वर्तीवली आहे
या परिसरात पोलीस स्टेशन पासून पाणी येत असते तर काही नी मुख्य रस्ते फोडून पाण्याचा प्रवाह हा या लोकवस्तीकडे वळविला आहे
या प्रभागाकरीता निर्वाचित झालेले नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी नगर परिषद कडे पाठपुरावा करावा सोबतच नप चे स्वीकृत सदस्य विनोद ढाकुनकर सुद्धा याच वस्तीलगत राहतात त्यांनी सुद्धा आपल्या स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर डुकरे यांनी केली आहे
नगर परिषद ने आमच्या समस्येकडे लक्ष केंद्रित न केल्यास आम्ही प्रभागातील नागरिकांचे शिष्टमंडळासह आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट घेणार असल्याची माहिती ईश्वर डुकरे यांनी दिली.