उस्मानाबाद :- किरण घाटे विशेष प्रतिनिधी – जिल्हा शासकीय रुग्णालय व महिला रुग्णालयात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या वतीने पाणी दान उपक्रम राबविला जातो,या उपक्रमाला प्रतिसाद देत पाणी दाते पाणी दान करतात. सध्या पाणी दानाचा नित्य उपक्रम सुरु असुन शासकीय रुग्णालय व महिला रुग्णालयात पाणी दाते पाणी दान करत आहेत .उमेश राजे निंबाळकर यांचे सातत्याने पाणी दान सुरू असुन आत्तापर्यंत पाणी दाते मृत्युंजय माणिक बनसोडे,अंकुश अण्णा उबाळे,राजरत्न दादा शिंगाडे मित्र मंडळ,ब्रदर रौफ शेख, नंदकुमार पिंपळकर सुफी संत धर्मगुरू सरकार वली सिंकदशाह कादरी ,ग्रामसभा संस्थेचे अमर आगळे,चैतन्य भैय्या कदम मित्र परिवार, रमेश कांबळे ,स्वप्निल भैय्या शिंगाडे,धनराज सराफ,प्रमोद हावळे,प्रविण गाडे ,डॉ स्मिता शहापुरकर आसेफभाई पठाण,व इतर पाणी दाते यांनी पाणी दान केले व सध्याही हा उपक्रम सुरु आहे.उन्हाळ्याची तीव्रता अजुनही जाणवत आहे . रुग्णालयात रुग्ण संख्या असुन पाण्याची टंचाई जाणवत आहे. शक्य तितक्या स्वरुपात आपणही पाणी दान उपक्रमात सहभागी होऊन पाणी दान करावे असे आवाहन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने करुन पाणी दात्यांचे आभार गणेश रानबा वाघमारे यांनी आज मानले आहे .या उपक्रमात प्रामुख्याने अब्दुल लतिफ,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने सचीन चौधरी,रमेश गंगावणे, सलीम शेख, विशाल घरबुडवे, शिवाजी वाघाळे,धम्मशिल शिंगाडे,शिंदे यांचा सहभाग आहे .
Home ईमपॅक्ट 24 न्यूज नेटवर्क उस्मानाबादच्या कल्याण समितीच्या पाणीदान उपक्रमाला मिळताेयं उस्फुर्त प्रतिसाद !