नांदेड जिल्हा प्रतिनिधी✍🏻चंद्रकांत राजूरकर
मो.8600420232नांदेड/मुखेड :-
अण्णा भाऊ साठे चौक मुखेड येथील मास जनसपंर्क कार्यालयात मासची कार्यकरणी जाहीर,मातंग समाजातील विविध समस्येच निवारण करण्यासाठी व मातंगसमाज व बहुजन समाजातील वंचित पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मासचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मासची कार्यकरणी जाहीर होत आहे त्याचाच एक भाग म्हणून नांदेड मध्ये सुद्धा ही निवड होत आहे, ही निवड मासचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष नितीनदादा तलवारे यांच्या हस्ते ही निवड प्रक्रिया पार पडली, या वेळी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत नांदेड जिल्हा सचिव पदी
नारनाळीचे मा. सरपंच नारायण सोमवारे यांची निवड करण्यात आली
तसेच,
मातंग समाजातील प्रतिभावंत गीतकार, संगीतकार,शाहीर विनोद गवाले यांची नांदेड जिल्हा सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली, तसेच यावेळी,मुखेड महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलाबाई वाघमारे यांची निवड तसेच,
कंधार महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी अतिशय निर्भीड, धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या चौत्राबाई कांबळे यांची निवड व
मुखेड महिला आघाडी तालुका कोषाध्यक्ष पदी मथुराबाई गायकवाड यांची निवड तर,
महिला आघाडी येवती सर्कल उपाध्यक्ष पदी सुंदरबाई गायकवाड यांची निवड करण्यात आली,यावेळी उपस्थित,
मासचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार नितीनदादा तलवारे,मासचे नांदेड जिल्हा कायदेविषयक सल्लागार ऍड. लक्ष्मीकांत दूधकावडे,
मासचे मुखेड तालुकाध्यक्ष अनिल कावडे,मासचे मुखेड तालुका कामगार आघाडी प्रमुख
आत्माराम गायकवाड,
मासचे मुखेड तालुका उपाध्यक्ष सुनील गोजेगावकर,मासचे मुखेड तालुका प्रसिद्धी प्रमुख केशव गायकवाड
तसेच,
भारतबाई उमरदरीकर
आदी जण उपस्थित राहून निवड करण्यात आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरावरून शुभेच्छाचा वर्षांव होत आहे.