आमदार नामदेव ससानेंच्या पाठपुराव्याला यश ..
उमरखेड प्रतिनिधी/आसीफ खान पठाण मो.9921812003
यवतमाळ/ उमरखेड :- येथील कुटीर रुग्णालयाला उपजील्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर रुग्णालयातील पदे भरण्याचा प्रश्न निकाली काढण्याकरिता सतत पाठपुरावा करणारे आमदार नामदेव ससाने यांना यश मिळाले असून शासनाने येथे ९४ पदे मंजूर केली आहे अशी माहीती भाजपा जिल्हाअध्यक्ष नितिन भुतडा यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली .
येथे उपजि़ल्हा रुग्णालयाची इमारत २२करोड रुपये खर्च करून उभारण्यात आली असून पुर्णत्वास आली आहे. सध्या इथे ३० खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे . या रुग्णालयात मंजूर पदे असलेली मात्र पदे भरण्यासाठी आमदार नामदेव ससाने यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने नुकतीच ९४ पदांची मंजुरी मिळाली त्यामध्ये ९४ पदापैकी २१ पदे ही नियमीत आहे तर उर्वरीत पदे ही तासीकेप्रमाणे भरण्यात येणार आहे . यामध्ये एक वैद्यकिय अधिक्षक , वैद्यकिय अधिकारी शस्त्रक्रिया एक , स्त्रीरोग तज्ञ एक,भुलतज्ञ एक , वैद्यकीय अधिकारी गट अ एक , बालरोग तज्ञ एक , अस्थिरोग तज्ञ एक , नेत्रशल्यचिकित्सक एक , दंतरोग एक , वैद्यकिय अधिक्षक अपघात कक्ष ४ , वैद्यकिय अधिकारी साधारण एक यांचेसह सर्व विशेषज्ञपदे मंजूरात झाली आहे . या मंजूरात पदामुळे यापुढे उमरखेड तालूक्याची आरोग्य व्यवस्था बळकट होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली .