चंद्रपूर विदर्भ किरण घाटे – महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नुकताच चंद्रपूर जिल्ह्याचा दाैरा केला .या दाै-या दरम्यान आेबीसी समन्वय समिती बल्हारपूर व अन्नदाता एकता मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले .सादर केलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांचा अंतर्भाव हाेता .
ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यांसाठी महाविकासआघाडी ने प्रयत्न करावे .सन २०१९ आणि २०२०वर्षात जाहीर केलेल्या ओल्या दुष्काळाची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी ,चालू पिककर्ज खातेदारांना ५०,०००/- रूपयां पर्यंत प्रोत्साहन म्हणून घोषित केलेली रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी.शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पीककर्ज पुनर्गठीत केलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यांत यावी.
पांदन रस्त्यांच्या खडीकरणाचे कामे तातडीने मंजूर करावी .
डिमांड भरल्यानंतर ७ दिवसात शेतक-यांना वीज कनेक्शन देण्यांत यावे .नाना पटाेले यांना उपरोक्त मागण्यांचे निवेदन सादर करतांना ओबीसी समन्वय समिती बल्लारपुर व अन्नदाता एकता मंच,भद्रावतीचे उमाकांतजी धाडे,विवेक खुटेमाटे,सुनील भटारकर,नंदकिशोर वाढई, संदिप खुटेमाटे,अनुप खुटेमाटे तथा इत्तर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.