अहमदनगर(✍🏻ज्ञानेश्वर गायकर पाटील.) संगमनेर:- १०/६/२१
नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे च्या कामास गती मिळाली असून , जमीन अधिग्रहण प्रक्रिया व मोजणी महारेल ने चालू केली आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावात मोजणी प्रक्रिया सुरू असून , संगमनेर रेल्वे स्टेशन हे कार्गो रेल्वे स्टेशन असल्याने , या स्टेशन ला प्लॉट ही शोधला असल्याचे निदर्शनास आले आहे.
पूर्वीचा प्रस्थवित रेल मार्ग हा हिवर गाव पावसा नंतर पुर्वे कडून पच्छिंम दिशेला क्रॉस होऊन अकोले तालुक्यातील दुर्गम अशा देवठाण मार्गे जात होता ,तो आता बदलण्यात आला असून केवळ राजकीय वजन वापरून हा प्रकल्प संगमनेर च्या पूर्वेकडून जात असून , दुर्गम व आदिवासी अकोले तालुका रेल्वे पासून वंचित राहणार आहे. अकोल्यात रेल्वे स्टेशन नसणार या विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली असून , काल अकोले तालुका शिवसेना पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना निवेदन ही दिले असून तहसील कार्यालयात आंदोलन ही केले. राष्ट्रवादी ही आंदोलनास प्रेरित झाली असून , काँग्रेस पक्ष ही आंदोलन करणार असून किसान संघटना, भाजप आदी संघटना ही मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. अकोले तालुका विकास साधण्या करिता राजकीय जोडे बाजूला ठेवतो हा इतिहास असून , आज जर आंदोलन केले नाही तर भविष्यात अकोले रेल्वे सेवा पासून वंचित राहील. काही पैसे वाले लोक यांनी संगमनेर तालुक्यात अनेक शेतकरी यांच्या जमिनी वर्षापूर्वी जमिनी घेतल्या असून , त्या जमिनी आता चार पट भावाने महारेल ला विकणार असून , महारेलच्या खर्चात मोठी वाढ होणार असून , तुलनेत अकोले तालुक्यातील खर्च हा कमी असल्याचा दावा शिवसेना नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार यांची भेट घेणार असून , भारतीय जनता पक्ष रेल्वे मंत्री यांना भेटणार असून , लवकरच अकोले तालुक्यात रेल्वे तापणार असे चित्र आहे.