यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन व क्रांति दिन साजरा
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन व क्रांति दिन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी राजीव गांधी नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भगवान बीरसामुंडा व माजी मंत्री स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राज्यभरात सर्वत्र आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन व क्रांति दिन साजरा करण्यात आला. या निमित्त चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने शहरातील राजीव गांधी नगर येथे कार्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम भगवान बीरसामुंडा व माजी राज्यमंत्री दिवंगत बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करत सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर यांनी आपल्या छाेट्याखानी भाषणातुन उपस्थित महिलांना या दिनाचे महत्व पटवुन दिले. विविध शासकीय योजना आदिवासी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाला केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभाग प्रमुख वैशाली मेश्राम यांनी तर आभार माधुरी पेंदोर यांनी मानले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या दुर्गा वैरागडे , विमल काटकर , नंदा पंधरे, माला पेंदाम, वैशाली मद्दीवार, प्रिती मडावी, कांचन बंसोड, माला मानिकपुरी, सुशीला मल्ले, उषा मेश्राम, नंदिनी मेश्राम, मिना जामगडे, जोत्सना कुळसंगे, छाया कन्नाके, हंसकला पटले, जया पांडे , आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संचालन मेश्राम यांनी केले.